गरोदर म्हणजे काय?HealthPlanet

Posted on Tue 11th Oct 2022 : 16:38

स्त्रीच्या गर्भाशयातील भ्रूण किंवा गर्भ म्हटल्या जाणाऱ्या एक किंवा अधिक अपत्यांची वाढ म्हणजे गर्भावस्था किंवा गरोदरपण होय. गर्भावस्थेत जुळे किंवा तिळ्यांप्रमाणे अनेक सगर्भता असू शकतात.
गरोदरपणाची तयारी कशी करावी हा प्रश्न अनेक नवविवाहीत जोडप्यांचा प्रश्न असतो. योग्य आहार वैद्यकीय तपासण्या केल्या आणि गर्भाच्या वाढीला हानीकारक गोष्टी टाळल्या तर बाळाची वाढ योग्य होते.

गरोदरपणात बाळाची संपूर्ण वाढ ही आईच्या आरोग्यावर अवलंबून असते. त्यामुळे गरोदरपणात आई पूर्णपणे निरोगी असणे जरुरीचे आहे. गरोदरपणात पूर्वी पासूनच आहारात योग्य पोषणमूल्य असावीत. प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट जीवनसत्व यांचे योग्य प्रमाण असलेला आहार असावा. आईचे पोषण जर योग्य असेल तर बाळाची मानसिक तसेच शारीरिक वाढ उत्तम प्रकारे होते.

योग्य आहारामुळे गरोदरपणातील मधुमेह उच्चरक्तदाब यासारख्या आजारापासुनही संरक्षण मिळू शकते. गरोदरपणाबद्दल सविस्तर माहिती यापुढे आपण घेऊ.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info